1994मध्ये डिजनीतर्फे पहिल्यांदा रिलीज करण्यात आलेला ऍनिमेटेडपट ‘द लायन किंग’ आजही नाईंटीजच्या किड्ससाठी तेवढाच स्पेशल आहे यात शंका नाही. मात्र त्यातच भर म्हणून बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान या चित्रपटासाठी आपला मुलगा आर्यन खानसह आवाज देणार असल्याने फॅन्ससाठी हा दुग्ध शर्करा ठरला आहे. दरम्यान, नुकताच या चित्रपटाचा हिंदी टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टिझर मध्ये ‘सिम्बा’ या मुख्य भूमिकेला आर्यन खानचा आवाज देण्यात आला आहे. तर ‘मुफसा’ या भूमिकेसाठी शाहरुख आवाज देणार आहे. येत्या 19 जुलै रोजी हा चित्रपट भारतामध्ये हिंदीसह तामिळ आणि तेलगू या भाषांमध्ये देखील रिलीज केला जाणार आहे.
Presenting #AryanKhan as the voice for #Simba! #TheLionKing in cinemas July 19@iamsrk pic.twitter.com/a0KA0Pam8V
— Walt Disney Studios (@disneyfilmindia) July 11, 2019