उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे मतदानासाठी मतपत्रिकांचा वापर करण्याची वेळ 

तेलंगणच्या निजामाबाद मतदारसंघातील स्थिती

हैदराबाद – तेलंगणच्या निजामाबाद लोकसभा मतदारसंघातून तब्बल 185 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे त्या मतदारसंघात मतदानासाठी मतपत्रिकांचा वापर करण्याची वेळ निवडणूक आयोगावर आली आहे.

तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या कन्या के.कविता निजामाबादमधून पुन्हा लोकसभा निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. त्यामुळे त्या मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरली आहे. त्याशिवाय, शेतकऱ्यांनी थोपटलेले दंड हाही चर्चेचा विषय ठरला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि राज्यातील तेलंगण राष्ट्र समिती सरकारचा निषेध करण्यासाठी त्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय 170 शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यांनी माघार न घेतल्यामुळे निजामाबादमधील उमेदवारांची संख्या 185 वर पोहचली आहे.

उमेदवारांची संख्या 64 वर गेल्यास मतदानासाठी इलेक्‍ट्रॉनिक यंत्राच्या (ईव्हीएम) जागी मतपत्रिकांचा वापर करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. आता निजामाबाद मतदारसंघासाठी मतपत्रिका बनवण्याच्या हालचाली निवडणूक आयोगाने सुरू केल्या आहेत. दरम्यान, तेलंगणात लोकसभेच्या एकूण 17 जागा आहेत. त्यासाठी 443 उमेदवार नशीब आजमावत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)