मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारकडून वेळ काढूपणाचे धोरण : शिवराज सिंह चौहान यांचा आरोप

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी आज मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारवर घणाघाती टीका केली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काल काँग्रेस सरकार छिंदवाडा येथे संगीत पथक प्रशिक्षणाचे केंद्र उभारणार असल्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या या घोषणेबाबत बोलताना मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्र्यांची संगीत पथक प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा ही राज्यातील बेरोजगारांची थट्टा आहे अशी टीका केली.

मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार हे आगामी लोकसभा निवडणुकांची वाट पाहत असून त्यासाठी सरकार वेळ काढूपणाचे धोरण राबवत आहे असा आरोप देखील चौहान यांनी यावेळी बोलताना केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)