पहिल्याच दिवशी धनंजय मुंडेंची दमदार एन्ट्री ; चंद्रकांत पाटलांवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ

मुंबई: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाची सुरुवात आजपासून झाली आहे. पहिल्याच दिवशी आरक्षण आणि दुष्काळाच्या मुद्यावरून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली आहे.

विधान परिषदेत शोकप्रस्ताव मांडण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी माजी विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांना शासकीय इतमामाम अंत्यसंस्कार करण्यात आले नसल्याबाबत विषय उपस्थित केला. आणि सरकारने माफी मागावी आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. यावर सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत आजच चौकशी अहवाल सभागृहात ठेवणार असल्याचे सांगितले.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनगर, मराठा, मुस्लिमांना आरक्षण द्या आणि शेतकऱ्यांना ५० हजार रुपये दुष्काळी मदत मिळावी, या मागण्यांसाठी विरोधकांनी विधानभवनाच्या  पायऱ्यांवर विरोधकांनी ठिय्या मांडला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर शोकप्रस्ताव मांडला.

दरम्यान, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या शोकप्रस्तावावर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
77 :thumbsup:
20 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
5 :blush:
3 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)