भारत-पाकिस्तान मधील युद्धाचा धोका अजूनही टळलेला नाही – इम्रान खान

इस्लामाबाद – भारत पाकिस्तान या दोन्ही देशातील युद्धपरिस्थिती अजूनही कमी झाली नसल्याचे मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतातील मोदी सरकार पाकिस्तानात घुसून आणखी एखादी कारवाई करु शकते, अशी शक्यता इम्रान खान यांनी बोलून दाखवली आहे.

धोका अजूनही संपलेला नाही. भारतातील लोकसभा निवडणुकीपर्यंत दोन्ही देशातील संबंध  तणावपूर्ण कायम राहतील. आणि त्यामुळे भारताने कोणतेही आक्रमक पाऊल उचलल्यास आम्ही प्रतिकारासाठी सज्ज असल्याचे इम्रान खान यांनी म्हंटले आहे.

१४ फेब्रुवारी २०१९ ला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामामध्ये केलेल्या भीषण हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता. भारताने पुलवामा हल्ल्याचे प्रतिउत्तर म्हणून पाकिस्तानातील बालकोटमध्ये जैशच्या तळावर एअरस्ट्राइक केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानची फायटर विमाने भारतात घुसली होती. आणि त्यावेळी भारताच्या विमानांनी त्यांना पिटाळून लावले होते. २७ फेब्रुवारीला दोन्ही देशांमधील तणाव अधिकच चिघळला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)