“मुन्नाभाई’च्या तिसऱ्या भागाची तयारी सुरु

“संजू’नंतर आता राजकुमार हिरानी लवकरच “मुन्नाभाई’ सिरीजच्या पुढच्या भागाच्या तयारीला लागणार आहे. “संजू’चे प्रमोशन सुरु असतानाच त्याने ही बाब स्पष्ट केली होती. “मुन्नाभाई 3’ची स्क्रीप्ट तयार आहे. या स्क्रीप्टवर सध्या अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरु आहे. ते संपल्यावर लगेचच पुढच्या कामाला सुरूवात होणार आहे. पहिल्या दोन्ही भागांप्रमाणे तिसऱ्या भागामध्येही संजय दत्त आणि अर्शद वारसी हे दोघे लीड रोलमध्ये असणार आहेत.

मात्र बाकीच्या कलाकारांची निवड अद्याप व्हायची आहे. अन्य रोलचे लिखाण पूर्ण झाल्यावर त्याच्या आधारे कलाकारांची निवड केली जाईल. ही निवडही स्वतः राजू हिरानी करणार आहे. आपल्या सिनेमासाठी आपण कधीच कलाकारांना महत्व देत नाही, तर सिनेमातील व्यक्तीरेखेला अधिक महत्व देतो. त्यामुळेच आपल्या सिनेमातील रोल लक्षात राहतात, असे राजू हिरानीने सांगितले. “मुन्नाभाई’सिरीजमधील तिसऱ्या भागाचे नाव “मुन्नाभाई चले अमेरिका’ असणार आहे. असे पूर्वी समजले होते. पण हे सिनेमाचे खरे नाव असणार नाही. खरे नाव यथावकाश जाहीर केले जाईल, असेही राजूने सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)