पिंपरी –बहिणीसोबत भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची बोरमाळ दुचाकीवरील अज्ञात चोरट्यांनी हिसका मारुन चोरुन नेली. ही घटना गुरुवार (दि.16) रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली.
याप्रकरणी 50 वर्षीय वृध्द महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला या त्यांच्या बहिणीसोबत गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपळे निलख विशालनगर येथील कृष्णा मेडीकलसमोरुन भाजी खरेदी करुन घरी जात होत्या. यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या बहिणीच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची व 50 हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ हिसका मारुन चोरुन नेली.