दहशतवाद्यांना पाताळातून शोधूनही शिक्षा देईल – मोदी 

नाशिक –  दहशतवाद्यांना सुद्धा आता माहिती आहे की, भारतामध्ये कोणत्याही भागात बॉम्बस्फोट केल्यास मोदी पाताळातून शोधूनही शिक्षा देईल आणि ठार मारेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे. ते आज नाशिकच्या पिंपळगाव येथे भाजपा-शिवसेना महायुतीची प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाचाही उल्लेख केला.

नरेंद्र मोदी म्हणाले कि, मी बोलताच विरोधकांना विजेचा झटका लागतो. पहिल्या दोन टप्प्यातील मतदाना नंतर देशभरातून जो संदेश आला आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालील जमीन सरकली आहे. भारत आज आपल्या समोर असलेल्या संकटांचा निडर होऊन सामना करत आहे. आमची सत्ता येण्यापूर्वी देशात बॉम्बस्फोट होत होते, त्यावेळचं सरकार काय करत होतं? आता दहशतवाद्यांना सुद्धा माहिती आहे की, भारतामध्ये कोणत्याही भागात बॉम्बस्फोट केल्यास मोदी पाताळातून शोधूनही शिक्षा देईल आणि ठार मारेल, असे त्यांनी सांगितले.

आमच्या सरकारने दोन पटरींवर सरकार चालवले. यांपैकी समान्य माणसाचा स्तर उंचवावा यासाठी तर एकवीसाव्या शतकात भारताचा स्तर वाढावा यासाठी काम केले. आम्ही वेगाने गावागावात रस्ते बनवत आहोत तर देशातील प्रत्येक घराला वीज उपलब्ध होण्यासाठी मोफत वीज कनेक्शन देत आहोत. डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देत आहोत तर दुसरीकडे ग्रामिण भागात पोस्ट ऑफिस, बँकेत आम्ही बदल करत आहोत, बँकेच्या सुविधा ग्रामस्थांच्या घराघरात पोहोचवत आहोत. देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न केले. २३ मे रोजी पुन्हा मोदी सरकार येताच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत पोहोचवली जाईल, आताच्या नियमांत बदल केला जाईल, अशी ग्वाहीही मोदींनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)