हल्लेखोर इसिस दहशतवाद्याला अमेरिकेने 19 वर्षांनंतर शोधून मारले!

वॉशिंग्टन (अमेरिका): एका हल्लेखोर इसिस दहशवाद्याला अमेरिकेने 19 वर्षांनंतर शोधून मारले आहे. जमाल अल-बदायी असे या इसिसच्या दहशतवाद्याचे नाव आहे. 19 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या एका युद्धनौकेवर त्याने दहशतवादी हल्ला केला होता.

एडनच्या खाडीत, येमेनेच्या किनाऱ्यावर इंधन भरण्यासाठी उभ्या असलेल्या यूएसएस कोल या लढाऊ जहाजावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. स्फोटकांनी भरलेली नौका दहशतवाद्यांनी यूएसएस कोलवर आदऴवली होती.
या हल्ल्यात 17 नौसैनिक ठार आणि 40 नौसैनिक जखमी झाले होते. अनेक नौसैनिक बेपत्ता असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या दहशतवादी हल्ल्यात यूएसएस कोलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

9/11 च्या दहशतवादी हल्याच्या तपास चालू असताना यूएसएस कोलवरील हल्ल्याचा अल कायदाचा दहशतवादी जमाल अल बदायी हा सूत्रधार असल्याचे उघड झाले होते. त्याच्यावर अन्य 50 दहशतवादी हल्ले केल्याचेही आरोप होते.
जमाल अल बदायीवर अमेरिकेने 50 लाख डॉलर्स (35 कोटी रुपये) चे बक्षिस जाहीर केले होते.

अमेरिकेने हवाई दलाला जमाल अल-बदायी येमेनमध्ये लपलेल्या ठिकाणाची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार केलेल्या हवाई हल्ल्यात जमाल अल-बदायी मारला गेला. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने अल बदायी मारला गेल्याच्या माहितील दुजोरा दिला आहे. अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन लष्कराच्या पराक्रमाचे कौतुक केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)