शुक्रताल येथील हनुमान धाम मंदिराला संरक्षण

भीम आर्मीने दिला हनुमान मंदिर ताब्यात घेण्याचा इशारा

मुज्जफरनगर: एका राज्यातील निवडणुक प्रचाराच्यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी हनुमान हे दलित होंते असे विधान केल्याने त्यांच्या या विधानावरून निर्माण झालेले वादंग अजूनही सुरूच आहे. हनुमान हे दलित असल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितल्यामुळे आम्ही आता सर्व हनुमान मंदिराचा ताबा घेऊन तेथे दलित पुजारी नेमणार आहोत असे प्रतिपादन भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांनी केले आहे.

त्यासाठी आम्ही प्रथम शुक्रताल मंदिराचा ताबा घेणार आहोत असे त्यांनी म्हटल्यानंतर तेथे सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राजस्थानातील अल्वार येथील एका प्रचार सभेत बोलताना योगी अदित्यनाथ यांनी हनुमान हे वनवासी होते, ते उपेक्षित आणि दलित होते त्यांनी सर्व भारतीय जातींना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाबद्दल राजस्थानातील काही उजव्या विचारांच्या संघटनांनी योगींना कायदेशीर कारवाईची नोटीस पाठवली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)