‘वॉर’ चित्रपटाचा टीझर आऊट : हृतिक-टायगर येणार एकमेकांसमोर

अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्यामधील ऑनस्क्रीन टक्कर पाहण्याची पर्वणी लवकरच उपलब्ध होणार आहे. आगामी यशराज फिल्म्सच्या चित्रपटात हे दोन अभिनेते एकत्र झळकणार आहेत. विशेष म्हणजे हे दोघे एकमेकांना भिडणार आहेत. वॉर असे या चित्रपटाचे नाव असून त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

तुझ्या ऍक्‍शनमध्ये थोडी कमतरता आहे, ते नीट कसं करतात हे मी तुला शिकवतो, असे म्हणत टायगरने टीझर शेअर केला. तर याला हृतिकनेही तोडीस तोड उत्तर दिले आहे.

ज्या क्षेत्राचा मी बादशहा आहे त्या क्षेत्रात तू आताच सुरुवात केली आहेस, थोडा वेळ आराम कर, असे हृतिकने म्हटले आहे. 53 सेकंदांच्या या टीझरमध्ये अफलातून साहसदृश्‍य पाहायला मिळतात. यामध्ये अभिनेत्री वाणी कपूरचा बिकनी अंदाजसुद्धा पाहायला मिळतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)