शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू

मुंबई: आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच अनुदानित अशासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्यात येणार असून त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच सरकारी शाळेतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत सरकार विचारधीन होता. त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयानुसार महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम, 1977 मधील व्याख्येनुसार राज्यातील शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अनुदानित खासगी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक विद्यालये व सैनिकी शाळेतील पूर्णवेळ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतन संरचनेचा लाभ मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होत असताना, शिक्षकांनाही त्याचवेळी हा वेतन आयोग लागू होत आहे. वेतन आयोगाच्या आतापर्यंतच्या इतिहासात यापूर्वी वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिक्षकांना कधी सहा महिन्यांनी, तर कधी आठ महिन्यांनी वेतन आयोग लागू व्हायचा. पण यंदा पहिल्यांदाच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रयत्नाने शिक्षकांनाही शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच सातवा वेतन आयोग लागू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)