कर विभागाचे कामकाज रविवारी सुरू राहणार

नवी दिल्ली -करदात्यांना कर भरता यावा याकरिता आयकर विभाग आणि जीएसटीची कार्यालये शनिवारी म्हणजे 30 मार्च रोजी चालू होती. त्याचबरोबर ही कार्यालये 31 मार्च रोजी चालू राहणार आहेत.

जीएसटी विभाग आणि प्रत्यक्ष कर मंडळाने तशा सूचना देशभरातील कार्यालयांना दिल्या आहेत. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संकलनाचे अर्थसंकल्पात ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर विभागांची शेवटच्या टप्प्यात धडपड चालू आहे.
केंद्र सरकारने सरलेल्या वर्षासाठी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात प्रत्यक्ष करातून 12 लाख कोटी रुपये संकलनाचे उद्दिष्ट ठरविले होते. तर जीएसटीमधून सरकार 11.47 लाख कोटी रुपयांची अपेक्षा होती. मात्र दोन्ही आघाड्यांवर काही प्रमाणात तूट निर्माण झाली आहे.

फेब्रुवारी महिन्यापर्यंत जीएसटी मधून सरकारला 10.70 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. तर 23 मार्चपर्यंत प्रत्यक्ष करातून सरकारला 10.21लाख कोटी रुपये मिळाले आहेत. कर विभागाला आणि करदात्यांना मदत व्हावी याकरिता रिझर्व्ह बॅंकेने देशातील सरकारी बॅंकांना 31 मार्च रोजी कार्यालय सुरू ठेवण्याची सूचना केलेली आहे. त्यानुसार रविवारी बॅंकांचे कामकाज होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)