प्ले स्टोअरमधून ‘टीक-टॉक’ ऍप डिलीट  

नवी दिल्ली – सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ असणारे ‘टीक-टॉक’ ऍपला केंद्र सरकारने प्ले स्टोअरमधून टीक-टॉक ऍप हटवण्याचे आदेश दिले होते. आता गुगल आणि अ‍ॅपल कंपनीने आपल्या प्ले स्टोअरमधून ‘टीक-टॉक ऍप डिलीट केले आहे. सरकारच्या कडक कारवाई आणि आदेशानंतर लोकांना आता टीक-टॉक’ डाउनलोड करता येणार नसून, ज्या लोकांकडे आधीपासून हे ऍप आहे. त्यांना सुद्धा ते पाहिल्यासारखे वापरता येणार नाही.

मात्र, शाओमी आणि विवो सारख्या अन्य ऍप स्टोअरवर हे ऍप उपलब्ध असल्याने ते डाऊनलोड करता येणार आहे. ‘टीक-टॉक’ ऍपच्या माध्यमातून अश्‍लील व्हिडीओ प्रसारीत केले जात असल्यामुळे सरकारने हे ऍप हटवण्याचे आदेश दिले आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)