डॉक्‍टरांच्या सुरक्षेचा विषय सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी होणार सुनावणी

नवी दिल्ली – देशभरातील सरकारी रूग्णालयांमध्ये डॉक्‍टरांसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करावी या मागणीसाठी डॉक्‍टरांच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर मंगळवारी म्हणजे उद्या सुनावणी घेण्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.

न्या दीपक गुप्ता आणि न्या सुर्यकांत यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सुनावणीसाठी आली आहे. कोलकत्यातील एका सरकारी रूग्णलयात एक रूग्ण दगावल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी तेथील डॉक्‍टरांवर हल्ला केला होता. त्यामुळे तेथील डॉक्‍टरांनी संप सुरू केला आहे. त्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी आणि डॉक्‍टरांच्या सुरक्षेच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज देशभरातील डॉक्‍टरांनीही एक दिवसांचा लाक्षणिक संप केला होता. त्याचवेळी त्यांनी न्यायालयातही धाव घेऊन हा विषय लाऊन धरण्याचे धोरण स्वीकारले.

पश्‍चिम बंगाल मधील सर्व सरकारी रूग्णालयांमध्ये सुरक्षा अधिकारी तैनात करावा अशी सुचना पश्‍चिम बंगाल सरकारला देण्यात यावी अशी मागणीही या संघटनेन केली आहे. डॉक्‍टरांच्या सुरक्षेसाठी देशव्यापी मार्गदर्शक तत्वे निश्‍चीत करावीत आणि त्याची काटेकार अंमलबजावणी व्हावी अशीही या संघटनेची मागणी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.