संचालकांना तडकाफडकी का हटविले : सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

सीबीआय अंर्तगत वाद प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

नवी दिल्ली: केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात (सीबीआय) सुरू असलेल्या अंतर्गत वादाप्रकरणी संचालक आलोक वर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. आलोक वर्मा यांचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय एका रात्रीत कसा घेतला?, असा सवाल न्यायालयाने केंद्र सरकारला केला आहे. उच्चाधिकार समितीची परवानगी न घेता हा निर्णय कसा घेतला, अशी विचारणाही केली आहे.

-Ads-

सीबीआयमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षानंतर केंद्र सरकारने हस्तक्षेप केला होता. या यंत्रणेवर नियंत्रण पुनर्स्थापित करण्यासाठी सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना या वरिष्ठ अधिका-यांचे अधिकार काढून घेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. या निर्णयाविरोधात वर्मा यांनी सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

केंद्राने दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यांपासून सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांमध्ये वाद सुरु होता. मग सरकारने सीबीआयच्या संचालकांचे अधिकार काढून घेण्यापूर्वी उच्चाधिकार समितीची परवानगी का घेतली नाही, असा सवाल न्यायालयाने विचारला.

केंद्रीय दक्षता आयोगाची बाजू मांडणारे ऍड. तुषार मेहता म्हणाले, सीबीआयचे दोन वरिष्ठ अधिकारी गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्याऐवजी एकमेकांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करत होते. त्यामुळे दोघांकडील अधिकार काढून घेणे हे योग्य होते, असे त्यांनी न्यायालयात सांगितले. अस्थाना आणि वर्मा यांची टीम एकमेकांच्या घरावर छापे टाकत होती.

अशा परिस्थितीत केंद्रीय दक्षता आयोग जे राष्ट्रपती आणि संसदेला उत्तर देण्यास बांधील आहे त्याने पावले उचलणे गरजेचे होते. अन्यथा आयोगाने काहीच केले नाही, अशी टीका झाली असती, असा युक्‍तीवाद मेहता यांनी केला. सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या याचिकेवर निर्णय राखून ठेवला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)