हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सज्जनकुमार सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली: शिख विरोधी दंगलीतील सहभागाबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सज्जनकुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्या शिक्षेच्या विरोधात सज्जनकुमार यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तथापी सज्जनकुमार यांची याचिका दाखल करून घेण्यापुर्वी आमच्या भावना लक्षात घ्या आणि त्यांच्या अर्जावर एकतर्फी निर्णय घेऊ नका अशी मागणी करणारे एक कॅव्हेट दंगलीतील पीडित शिख परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना कोर्टापुढे शरणांगती पत्करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. ती मुदत वाढवून देण्याची त्यांची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली आहे त्यानंतर त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांना आता अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागणार आहे. ती याचिका सर्वोच्च न्यायालय केव्हा सुनावणीसाठी घेणार आहे हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)