न्युयॉर्क: न्युयॉर्क येथील टाईम्स स्क्वेअर चौकात घातपाती कारवाया घडवण्याची योजना आखणाऱ्या एका इस्लामिक कट्टरपंथीय बांगलादेशी युवकावर येथील कोर्टात आज आरोप निश्चीती करण्यात आली. आशिकुल आलम असे या बांगला युवकाचे नाव असून तो 22 वर्षीय आहे. त्याने एक बंदुक आणि गोळ्या विकत घेऊन घातपात घडवण्याची योजना आखली होती. तसेच त्याने दोन अत्याधुनिक पिस्तुलेही विकत घेतली होती. त्याला गुरूवारी ब्रुकलिन येथे अटक करण्यात आली. तो मुळचा बांगलादेशी असला तरी त्याला आता अमेरिकन नागरीत्व मिळाले आहे. इस्लामसाठी लढता लढता मरण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती. इस्लामिक स्टेटलाही त्याचा पाठिंबा होता.
न्युयॉक येथील टाईम स्क्वेअर चौकात अंदाधुंद गोळीबार करून न्युयॉर्कवासियांची हत्या करण्याचा त्याचा डाव होंता. सुरक्षा अधिकारी त्याच्या पाळतीवरच होते त्यांनी कोणतेही दुष्कृत्य करण्याच्या आतच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.