अँटी सॅटेलाईट मोहिमेतील यश माजी पंतप्रधान मनमोहन सिंहांच्या दूरदृष्टीचे फलित : काँग्रेस नेत्याचा दावा

भारताने आज मिशन शक्तीच्या माध्यमातून शत्रूराष्ट्राचे अंतराळातील कृत्रिम उपग्रह पाडण्याचे तंत्रज्ञान भरताकडेही असल्याचा पुरावा जगासमोर मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका पत्रकार परिषदेद्वारे या मोहिमेच्या यशाबाबत देशातील जनतेला माहिती दिली आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्शवभूमीवर या अँटी सॅटेलाईट मोहिमेच्या यशावरून श्रेयवादाची लढत उफाळून येण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसतर्फे या मोहिमेच्या यशानंतर अँटी सॅटेलाईट मोहिमेतील यश माजी पंतप्रधान मनमोहन सिंहांच्या दूरदृष्टीचे फलित असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, “काँग्रेससरकारच्या काळात सुरुवात करण्यात आलेल्या अँटी सॅटेलाईट मोहिमेस अखेर आज यश आले. मी या यशाबाबत शास्त्रज्ञांचे तथा पंतप्रधान मनमोहन सिंहांच्या दूरदृष्टीचे अभिनंदन करतो.”

https://twitter.com/ANI/status/1110830593841995778

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)