सीएमईसमोरील भुयारी मार्ग लवकरच होणार खुला…!

मे महिन्यात सुरू होणार वाहतूक ः दोन वर्षांपासून रखडले होते काम
भुयारी मार्गामुळे होणारे फायदे
-सीएमईतील जवान व वाहनांना विना अडथळा ये-जा करता येणार

-वाहनांची इंधन व वेळेची बचत होणार
-दापोडीतील चौक सिग्नल फ्री होणार


पिंपरी –
जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील (सीएमई) भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्यात आले आहे. हा मार्ग एप्रिल महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार असून मे महिन्यामध्ये भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करणार आहेत. या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होणार असून नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून पुणे शहरात शिक्षण व नोकरीनिमित्त ये-जा करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांची संख्या लाखोंमध्ये आहे. वाहने दापोडी जवळ आल्यानंतर हळू-हळू वाहतूक कोंडीला सुरुवात होते आणि वाहतुकीचा वेगही मंदावतो. दापोडी या ठिकाणी भुयारी मार्गाचे काम दोन वर्षांपासून रखडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. पूल खुला झाल्यानंतर पिंपरीतील नागरिकांना पुणे शहरात जाण्यासाठी सर्व्हिस रस्त्याचा वापर न करता उड्डाणपुलाने जाता येणार आहे. तसेच, बीआरटी मार्गातून बस चालकांनाही अडथळा विरहित बस नेता येणार आहेत. सद्यस्थितीत हा मार्ग पूर्ण होत आल्याने नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

भुयारी मार्गासाठी जानेवारी 2017 मध्ये कामाचे आदेश देण्यात आले होते. मात्र, या मार्गावरील मेट्रोच्या पिलरचे काम सुरु असल्याने भुयारी मार्गाचे काम सहा महिने उशिरा सुरु झाले होते. यामुळे, या कामाला पर्यायाने 9 डिसेंबर 2017 ला 9 महिन्यांची पहिली मुदतवाढ देण्यात आली. यानंतरही दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्याने पुन्हा 30 सप्टेंबर 2018 ला दुसरी मुदतवाढ देण्यात आली. दुसऱ्यांदा दिलेली मुदतवाढ 15 जानेवारी 2019 ला संपूनही हे काम पूर्ण होऊ शकले नाही. परंतु, सध्या काम अंतिम टप्यात असल्याने मे महिन्यात नागरिकांसाठी भुयारी मार्ग खुला करण्यात येणार आहे.

या मार्गावर मेट्रोचे काम सुरु झाल्याने भुयारी मार्गाच्या कामाला उशीर झाला आहे. तसेच, सद्यस्थितीत या मार्गावर दिशादर्शक फलक, रंगरंगोटी, पथदिवे बसविण्याची कामे सुरु आहेत. या मार्गाचे काम एप्रिल महिन्याचे अखेरपर्यत पूर्ण होणार आहे.

विजय भोजने, उप अभियंता, स्थापत्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)