पर्रिकरांच्या बेडरूम मध्ये दडले आहे राफेलचे तथ्य ! : कॉंग्रेस

वक्तव्याच्या संबंधात कॉंग्रेसने ऐकवले संभाषण

मोदी सरकारकडून केली खुलाशाची मागणी

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवी दिल्ली: राफेल प्रकरणाच्या खऱ्या फायली आपल्या बेडरूम मध्ये पडल्या आहेत असे विधान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी कॅबिनेटच्या बैठकीत केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता. त्याच्या पुष्ट्यर्थ आज पर्रिकर यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री विश्‍वजीत राणे यांनी एका अज्ञात व्यक्तीशी केलेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग कॉंग्रेसचे प्रवक्ते रणपदीप सुर्जेवाला यांनी आज पत्रकार परिषदेत ऐकवले आहे.

त्यात विश्‍वजीत राणे यांनी दुसऱ्या एका व्यक्तीला सांगताना नमूद केले आहे की गेल्या आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राफेल प्रकरणातील सर्व कागदपत्रे आणि फाईल आपल्या फ्लॅट मधील बेडरूम मध्ये पडून असल्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांनी नमूद केले आहे. त्यामुळेच भाजप आपल्याला मुख्यमंत्रीपदावरून हटवू शकत नाही असे पर्रिकर यांनी म्हटल्याचेही सुर्जेवाला यांनी नमूद केले आहे.

आज संसदेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना सुर्जेवाला यांनी विश्‍वजीत राणे यांच्या संवादाची टेप पत्रकारांना ऐकवली आहे. या फाईल मध्ये पर्रिकर यांनी नेमके काय लपवले आहे हे देशाला समजले पाहिजे अशी मागणी सुर्जेवाला यांनी केली आहे. सरकारकडे काही तरी लपवण्यासारखे आहे म्हणूनच ते या प्रकरणाच्या जेपीसी चौकशीची मागणी मान्य करीत नाहीत असा आरोपही त्यांनी केला आहे. आता खुद्द मोदींनीच याचे उत्तर दिले पाहिजे असे ते म्हणाले. आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत पर्रिकर यांच्या संबंधात विश्‍वाजीत राणे यांची टेप वाजवण्याची मागणी केली होती पण सुमित्रा महाजन यांनी त्यांची ही मागणी अमान्य केली. त्यानंतर कॉंग्रेसने संसदेबाहेर पत्रकारांना ही टेप ऐकवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)