‘सुफळ संपूर्ण’ होणार का नचिकेतच्या प्रेमाची कहाणी!!

‘झी युवा’ ही वाहिनी नेहमीच निरनिराळ्या प्रकारच्या दर्जेदार मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येते. विनोदीकथा, भयकथा, प्रेमकथा, रहस्यकथा अशा सगळ्याच प्रकारच्या मालिकांमधून प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन होते. या मालिकांमध्ये आणखी एका मालिकेची भर पडणार आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती यावर भाष्य करणारी, त्याचे जतन करण्याची गरज असल्याची शिकवण देणारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ असे या नव्या मालिकेचे नाव आहे. भारतीय वंशाचा पण ऑस्ट्रेलियात राहणारा, नचिकेत देशपांडे हे या मालिकेतील मुख्य पुरुष पात्र आहे. अभिनेता निखिल दामले ही भूमिका साकारत आहे.

नचिकेत भारतीय वंशाचा आणि मुळात महाराष्ट्रीय असला, तरीही भारतीय संस्कृतीविषयी त्याला काहीच माहिती नाही. मराठीत बोलणे हे त्याच्यासाठी महाकठीण काम आहे. मराठी भाषेत लिहिण्या-वाचण्याशी त्याचा कधीच संबंध आला नसल्याने, त्याला मराठी वाचायला सुद्धा जमत नाही. त्याचा स्वभाव मात्र फारच मनमिळाऊ आणि मिश्किल आहे. कुणाशीही पटकन मैत्री करणे हा त्याचा स्वभावधर्म आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांविषयी चौकस असणे हा त्याचा स्थायीभाव आहे. मीडियाचा अभ्यास करणारा नचिकेत कामानिमित्त भारतात आला आहे. भारतात येऊन सई केतकर या मराठी मुलीच्या तो प्रेमात पडला आहे. सईचे आजोबा म्हणजेच आप्पा अनिवासी भारतीयांचा तिरस्कार करणारे आणि मराठीचा अभिमान असलेले गृहस्थ आहेत. त्यांच्यासमोर शुद्ध मराठीत बोलतांना नचिकेतची ‘ऑलमोस्ट’ तारांबळ उडते. यासगळ्या प्रसंगांमधून होणारी विनोद निर्मिती फारच खुसखुशीत असेल. प्रेमात पडलेल्या नचिकेतच्या आयुष्यात पुढे नेमक्या काय मजेदार घटना घडणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)