‘काजल डे’ : ‘गोष्ट एका दिव्यांग टेबल टेनिस प्रशिक्षकांची’

एका दुर्घटनेत आपले दोन हात गमाविल्यानंतर ‘काजल डे’ यांनी हार मानली नाही. त्यांचे म्हणणे आहे की, टेबल टेनिस या खेळानेच त्यांच्यात एक नवीन जोश, जिद्द निर्माण झाली. त्यामुळेच ते अगरतला येथे सर्वोत्तम टेबल टेनिस सेंटर (प्रशिक्षण केंद्र) चालवत आहेत. त्यांच्या या सेंटरमध्ये तयार झालेले खेळाडू आज राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करत आहेत. तसेच अनेकांनी राष्ट्रीय क्रमवारीत देखील स्थान प्राप्त केले आहे.

एका दुर्घटनेत त्यांनी आपले दोन्ही हात गमावले. तेव्हा ते 21-22 वर्षाचे होते. त्याचे वडील सरकारी रूग्णलयात चालकाची नोकरी करत होते. त्यावेळी अचानक त्याचे वडील राजेंद्र चंद्र यांचे निधन झाल्याने त्याच्यावरील छत्र हरवले. त्यावेळी त्यांना अगरतला येथील सरकारी विद्युत विभागात नोकरी मिळाली, मात्र त्या नोकरीत त्याचे मन लागत नव्हते.

दुर्घटनेत सापडलेल्या काजल डे यांच्यावर चार महिन रूग्णलयात उपचार चालू होता. या दुर्घटनेत हात गमाविल्यानंतर एकामागून एक संकटे त्याच्यांवर येत होते. दरम्यान वडिलानंतर काही काळानंतर आईचे सुध्दा निधन झाले. हात गमाविल्यानंतर त्यांना हाताची किंमत कळाली. त्यांनी हाताच्या उपचारासाठी राजस्थान, चंदिगड, पश्चिम बंगालमधील कोलकत्ता येथील प्रोस्थेटिक्स केंद्राला भेट दिली मात्र नशीबाने साथ दिली नाही अाणि त्यांच्यावर उपचार झाले नाहीत.

एका वर्षानंतर 1992 मध्ये त्यांना एकाने पुण्यातील पुण्यातील आर्टिफिशिअल लिंब्म सेंटर बदल सुचविले.  हे सेंटर सशस्त्र फोर्स मेडिकल काॅलेज अंतर्गत येते. त्याठिकाणी 5 महिने 17 दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तेथील डाॅक्टर त्यांच्यासाठी देव ठरले. त्यांनतर त्यांचा डावा हात बनविण्यात आला.

1993 मध्ये त्यांनी टेबल टेनिस खेळण्यास सुरूवात केली. ते सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ग्रूप डी कर्मचारी म्हणून काम करत आहेत. आणि मागील 3 वर्षापासून अगरतलामध्ये आंतरविभागीय टेबल टेनिस (ज्यामध्ये सक्षम खेळाडू खेळतात) स्पर्धेत ते तीनवेळा उपविजेते आहेत.ते एका राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेतही सहभागी झाले आहेत.

मागील 25 वर्षापासून ते त्याच्या हातामधील दोन हाडामध्ये टेबल टेनिसची बॅट ठेऊन खेळत आहेत.  त्यांनी आगरतला येथे टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. पुर्ण त्रिपूरात असे केंद्र नसल्याचे ते सांगतात. आणि 2003 पासून त्यांनी सुमारे 45 मुलांना प्रशिक्षित केले आहे. ते प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंकडून इतका सराव करुन घेतात की ते एकदम थकून जातात आणि ते खेळाडू त्यांना तुम्ही हिटलर असे म्हणतात. त्यांच्या खेळाडूंनी त्रिपूरा येथील राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत चार पदक मिळविले आहेत.

 

मौमिता शाह, अौरित्रा पाटारी, कल्याणी डे (त्यांची मुलगी) हे आज देशातील टेबल टेनिस क्रमवारीतील खेळाडू आहेत. मुलांमध्ये अर्धजीत चौधरी, अपूर्व दास, जयंत डे, अर्जित डे यांनी सुध्दा राष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. त्याची मुलगी कल्याणी डे हीने ही चांगली कामगिरी करत टेबल टेनिस खेळात 19 राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत 4 रौप्य आणि कास्यंपदक पटकाविले आहे. तसेच अनेक राज्यस्तरावर तिने अनेक पदके जिंकली आहेत.

‘काजल डे’ हे अनेक विद्यार्थ्यांना खेळाकडे करिअर म्हणून पाहा असा सल्ला देत असतात. ‘काजल डे’ हे इच्छुक विद्यार्थांना सकाळी 6.30 ते 8.00 आणि दुपारी 3 ते 5 यादरम्यान दररोज मोफत प्रशिक्षण देतात.

टेबल टेनिस खेळामुळेच त्यांच्या आयुष्यात उत्साह आला. त्याचे जीवन बदलून टाकले. टेबल टेनिस खेळामुळेच त्यांना अोळख मिळाली. आज ‘काजल डे’ नाव टेबल टेनिस खेळामुळेच सर्वांना माहित आहे, असे ते सर्वांना अभिमानाने सांगतात. त्यांना अाणखी खूप खेळाडू घडवयाचे आहेत, जे राष्ट्रीय स्तरावर त्रिपूरा शहराचे नाव चमकावतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)