घाना विद्यापिठातील महात्मा गांधींचा पुतळा हटविला

अक्रा: घाना विद्यापिठातील महात्मा गांधी यांचा पुतळा रातोहात हलवण्यात आला आहे. आफ्रीकी वंशाच्या लोकांच्या म्हणण्यानुसार, महात्मा गांधी वर्णभेदी होते. त्याच कारणामुळे गांधींजींचा पुतळा हटवण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी भारत आणि घाना यांच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून घाना येथील विद्यापीठात महात्मा गांधींचा पुतळा बसवण्यात आला होता.

गांधींजींना रेसिस्ट अशी उपाधी देऊन घाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या पुतळ्याला कडाडून विरोध दर्शवला होता. विद्यापीठातून गांधींचा पुतळा हटवण्यात यावा, अशी मागणी करत सातत्याने आंदोलनही सुरु होती. त्यानंतर विद्यापीठाने हा पुतळा हटविण्याचा निर्णय घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महात्मा गांधी यांनी त्यांच्या सुरुवातीच्या लेखांमध्ये आफ्रिकी नागरिकांना काफिर असे म्हटले आहे. तसेच या लोकांपेक्षा भारतीय श्रेष्ठ आहेत, असेही त्यांनी म्हटले होते. याच वाक्‍यांचा संदर्भ घेऊन विद्यापीठातील पुतळा हटवण्यात आला, अशीही माहिती मिळते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)