मोळमध्ये टॅंकर योजनेचा प्रारंभ

मोळ – दुष्काळाच्या झळांनी उत्तर खटाव परिसर होरपळू लागला आहे. मोळ, मांजरवाडी या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पण शासनाच्या मदतीची वाट न पाहता माजी जलसंपदामंत्री आ. शशिकांत शिदे यांनी या गावांना स्वखर्चातून तातडीने टॅंकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.

मोळ, ता. खटाव येथे आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून टॅंकरद्वारे मोफत पाणीपुरवठा योजनेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती सुनिल घोरपडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, युवकचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर जगताप, राजेंद्र कचरे, मुमताज मुलाणी, सरपंच जालिंदर वाघ, भगवान भोसले, तेजस फाळके, प्रदीप गोडसे उपस्थित होते. यानंतर शिंदेवाडीतील बैठकीत आ. शिंदे म्हणाले, ‘लोकप्रतिनिधींना विचारात न घेता चुकीचे निकष लावून खटाव तालुक्‍याला दुष्काळी यादीतून वगळले. राज्य शासनाने यादीत दुरुस्ती करून तालुक्‍याचा दुष्काळी यादीत समावेश करावा, तीव्र जनआंदोलन उभारून शासनाला तसा निर्णय घ्यायला भाग पाडू. तेजस फाळके यांनी सुत्रसंचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)