वाईच्या पश्‍चिम भागातील एसटीचे वेळापत्रक कोलमडले

भोंगळ कारभाराविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार

वाई –
सध्या परिवहन महामंडळाचा कारभार अतिशय बेजबाबदारपणे सुरु आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील एसटीचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. याचा महाविद्यालय व शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  वाई आगाराने तालुक्‍याच्या पश्‍चिम भागाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले असून एसटी एसटी बस वेळेवर येत-जात नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसस्थानकातही योग्य ठिकाणच्या फलाटला गाडी लागत नसल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांची दिशाभूल होताना दिसत आहे.

काही गाड्या अचानक रद्द करण्यात येत असल्याने दररोज बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाई आगाराच्या या भोंगळ कारभाराविरुध्द वाई तालुक्‍यातील शिवसेना रस्त्यावर उतरली असून आगाराने पश्‍चिम भागातील एसटी बसेस वेळेवर सोडव्यात तसेच कारभारात सुधारणा न झाल्यास शिवसेना भागातील विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून महमंडळाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहे, तशा आशयाचे लेखी निवेदन अभेपुरी भागातील शिवसेना विभागप्रमुख अमोल कोंढाळकर, आंनदा वाडकर व महिला आघाडी तालुकाप्रमुख कोमल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाईच्या आगार प्रमुखांना दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवेदनात असेही म्हटले आहे, वाई आगारातून एकाही बस वेळेत सुटत नाही, बस सुटलीच तर ती कोणत्या फलाट वरून सुटते हे प्रवाशांना कळत नाही. भागात सुटणाऱ्या एकाही बसला नावाचा योग्य बोर्ड लावलेला नसतो, अनेक बसेस नादुरुस्त असल्याने त्या कोठेही बंद पडत आहेत. बसच्या समस्येबाबत आगर प्रमुखांकडे तक्रार केल्यास उद्धटपणे उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या सर्व समस्या त्वरित दूर करून योग्य व चांगल्या पद्धतीच्या बसेस या भागात सोडण्यात याव्यात अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल. याची नोंद संबंधित विभागाने घ्यावी, असाही इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर शहर प्रमुख गणेश जाधव, आशिष पाटणे, अतुल भाटे यांच्यासह शेकडो विद्यार्थी व शिवसैनिकांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)