तपोवन रस्त्याच्या कामाने शहराच्या विस्तारीकरणास गती

आ. संग्राम जगताप ः रस्त्याच्या कामाची पाहणी

नगर  – गेल्या 25-30 वर्षांपासून उपनगरे वाढत आहेत मात्र वाढत्या लोकसंख्येनुसार लागणाऱ्या मूलभूत सोयी सुविधाकडे संपूर्ण दुर्लक्ष यापूर्वी झाले होते. ही उणीव आपण गेल्या साडेचार वर्षात भरून काढली आहे. उपनगरांच्या विकासाला प्राधान्य देत दळणवळणाच्या दृष्टीने विविध कॉलनी, वसाहती यांच्यात डांबरी रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या तपोवन रस्त्याच्या कामाला साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून या रस्त्याच्या कामामुळे शहराच्या विस्तारीकरणास मोठी मदत होणार असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

आ. जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या राज्य शासनाच्या निधीतून तपोवन रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या कामाची पाहणी आ. जगताप यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मनपातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते संपत बारस्कर, नगरसेवक कुमार वाकळे, डॉ.सागर बोरुडे, शिवाजी चव्हाण, बाळासाहेब बारस्कर, बाळासाहेब पवार, साहेबराव कसबे, रामदास ढवण, अशोक ढवण, सतीश ढवण, स्वप्निल ढवण, विलास ढवण, केतन ढवण, सत्यजित ढवण, सागर ढवण, सचिन तागड, प्रशांत निमसे, धीरज उकिर्डे, तुषार यादव, संभाजी पवार, अमोल कांडेकर, अंकुश चत्तर, प्रशांत धाडगे, एकनाथ खिलारी, सूर्यकांत झेंडे, बाळासाहेब झिने आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आ. संग्राम जगताप म्हणाले की, उपनगरातील जनतेने नेहमीच माझ्यावर विश्‍वास दाखवत माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. सर्व जनतेच्या आशीर्वादाने मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सावेडी उपनगरातील अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत.

सुमारे 15 कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे सुरू
नगर शहराच्या विकासाबरोबर उपनगराच्या विकासाला चालना देण्यासाठी शहराला व उपनगराला जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. यासाठी वारंवार शासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळे शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये तपोवन रस्त्यासाठी 3 कोटी 50 लाख, केडगावच्या अंबिका हॉटेलपासून ते सोनेवाडी, अकोळनेर ते सारोळा कासार या रस्त्यासाठी सुमारे 2 कोटी 52 लाख रुपये, केडगाव लिंकरोड रस्त्यासाठी 2 कोटी 25 लाख, कायनेटिक ते बुरूडगाव रस्त्यासाठी 1 कोटी 50 लाख, एम.आय.डी.सी. ते निंबळक रस्त्यासाठी 2 कोटी 50 लाख, नालेगांव भागातील वारुळाचा मारुती ते निंबळक या जुन्या रस्त्याच्या कामासाठी 3 कोटी 2 लाख 85 हजार रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यावर शहरातून परिसरातील गावांत जाणाऱ्या व परिसरातील गावांतून शहरात येणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होणार असल्याचे आ. जगताप यांनी सांगितले.

आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर झालेल्या या तपोवन रस्त्याचे इंद्रायणी हॉटेल ते भिस्तबाग महालापर्यंतचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे मनमाड रस्ता ते औरंगाबाद रस्ता यांना जोडणारा व पाईपलाईन रस्त्याला पर्यायी चांगला रस्ता होणार आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा प्रकल्प आम्ही हाती घेणार असून त्यामुळे या भागाचे नंदनवन होईल.

संपत बारस्कर , नगरसेवक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)