महाराष्ट्रात सपा-बसपाची आघाडी सर्व 48 जागा लढवणार

मुंबई (प्रतिनिधी) – भाजपाच्या विरोधात निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रातही आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडी म्हणून हे दोन्ही पक्ष राज्यात सर्वच्या सर्व म्हणजे 48 जागा लढवणार आहेत. उद्या, मंगळवारी मुंबईत आघाडीची औपचारीक घोषणा होणार आहे.

धर्मनिरपेक्ष आणि भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊ नये म्हणून समाजवादी पक्षाने कॉंग्रेस आघाडीत सहभागी होण्यास अनुकुलता दर्शवली होती. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी देशात कॉंग्रेससोबत कुठेही समझोता केला जाणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर उत्तरप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बसपचे महाराष्ट्र प्रभारी अशोक सिध्दार्थ आणि सपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी आजच्या संयुक्त पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा करतील, अशी माहिती बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी सोमवारी दिली. समाजवादी पक्षाकडून मुंबई, मराठवाड्यात तर विदर्भात बसप आपले उमेदवार उभे करतील. समाजवादीची उत्तर भारतीयांप्रमाणे मुस्लिम मतदारांवर मदार आहे. तर बसपची मदार दलित मतांवर आहे. या दोन्ही पक्षाच्या आघाडीमुळे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला मिळणाऱ्या
मतांवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)