मंगळावरील यानाने रेकॉर्ड केला तेथील वाऱ्याचा आवाज

टंम्पा: नासाच्या ईनसाईट लॅंडर यानाने मंगळाच्या पृष्ठभागावर वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज रेकॉर्ड केला आहे. तेथून संदेशाद्वारे पाठवलेले हे रेकॉर्डिंग अमेरिकेतील नियंत्रण कक्षाला प्राप्त झाले असून नासाने हे रेकॉर्डिंग आपल्या वेबसाईटवर टाकून ते सर्वांनाच उपलब्ध करून दिले आहे. हे यान मंगळाच्या पृष्ठ भागावर 26 नोव्हेंबर रोजी पोहचले असून त्या यानाच्या सोलर पॅनेलवरून वाहणाऱ्या वाऱ्याचे हे रेकॉर्डिंग आहे.

-Ads-

यानात एअर प्रेशर सेन्सरही आहेत तेथेही त्या ग्रहावरील वाऱ्याची नोंद व्हायब्रेशनद्वारे नोंदवली गेली आहे. यानातील रोबो द्वारे मंगळाच्या पृष्ठ भागावर सेस्मोमीटर बसवले जाणार आहेत. या सेस्मोमीटरनेच पहिल्या पंधरा मिनीटांतच तेथील वाऱ्याच्या आवाजाचे व्हायब्रेशन नियंत्रण कक्षाला पाहोचवले. मंगळावर या आधी सन 1976 मध्ये पाठवण्यात आलेल्या यानानेही तेथील वाऱ्याच्या आवाजाची नोंद केली होती अशी माहिती नासाच्या वैज्ञानिकांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)