उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री खंडुरी यांच्या मुलाचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

डेहराडून – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री बी.सी.खंडुरी यांचे पुत्र मनिष यांनी शनिवारी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात ती घडामोड भाजपसाठी हादरा मानली जात आहे. मनिष यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या येथील सभेत त्या पक्षात प्रवेश केला. त्यांना उत्तराखंडच्या पौडी लोकसभा मतदारसंघातूून कॉंग्रेसकडून रिंगणात उतरवले जाण्याची शक्‍यता आहे. त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या बी.सी.खंडुरी करतात.

मागील निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर विजयी झाले होते. खंडुरी संसदेच्या संरक्षणविषयक स्थायी समितीचे अध्यक्षपद भुषवत होते. त्या पदावरून त्यांना मागील वषी हटवण्यात आले. तेव्हापासून खंडुरी पिता-पुत्र भाजपवर नाराज असल्याचे समजते. राहुल यांनी खंडुरी यांना त्या पदावरून हटवण्यात आल्याचा उल्लेखही सभेत केला.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)