राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचा पुत्रासह शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसला हातकणंगले मतदारसंघात झटका बसला असून माजी खासदार निवेदिता माने आणि त्यांचे पुत्र धैर्यशील यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत आज शिवसेनेत प्रवेश केला. धैर्यशील हे आता हातकणंगले मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या प्रवेशावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, आमदार उल्हास पाटील आदी उपस्थित होते.

हातकणंगले मतदार संघातील विद्यमान खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची गेल्या आठवड्यात भेट झाल्यानंतर या मतदारसंघातील समीकरणे बदलणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार तसेच घडले. शरद पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यात शेट्टी यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला होता. माने कुटुंबीय तडजोडीच्या भूमिकेत नसल्याने धैर्यशील यांनी थेट आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)