लाखो रुपयांची सौर ऊर्जा यंत्रणा दोन वर्षांतच बंद

जुन्या इमारतीवरील यंत्रणा बंद असताना नवीन उभारणीचे काम सुरू

पुणे – महापालिकेतील नगरसेवकांचा विरोध डावलून तत्कालिन आयुक्त कुणाल कुमार यांच्या अधिकारात महापालिकेच्या जुन्या इमारतीवर उभारण्यात आलेली सौर उर्जा यंत्रणा अवघ्या दोन वर्षातच बंद पडली आहे. त्यामुळे लाखोंचा खर्च वाया गेल्यात जमा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या इमारतीमधील विद्युत पंप तसेच काही विभागांसाठी वीज पुरवठा करण्यासाठी ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जुन्या इमारतीवर ती धूळखात पडून असतानाच, पुन्हा नवीन विस्तारीत इमारत आणि जुन्या इमारतीच्या काही भागात “सेकी’ अर्थात सोलर एनर्जी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून नवीन यंत्रणा उभारली जात आहे.
दोन वर्षांपूर्वी महापालिकेने सौर सिटी योजनेचा प्रस्ताव तयार केला होता.

तो महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाकडे (मेडा) मान्यतेसाठी पाठविला होता. त्याच वेळी पालिकेच्या जुन्या इमारतीवर नगरसचिव विभागाच्या वरील बाजूस सुमारे 26 लाख रुपये खर्चून सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यात आली. त्यावर महापालिकेच्या इमारतीचा पाणी पंप तसेच काही कार्यालयांसाठी वापर केला जात होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या यंत्रणेत बिघाड झाला असून ती बंद आहे. त्यामुळे 26 लाखांचा खर्च पाण्यात गेला आहे.

सौर पॅनलचा वापर करणार

ही सौर यंत्रणा बंद असल्याच्या वृत्तास विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांनीही दुजोरा दिला. मात्र, यासाठी आवश्‍यक काही यंत्रणा नादुरुस्त झाल्याने ती पुन्हा सुरू करता येणार नाही. त्यामुळे या यंत्रणेचे पॅनल नवीन उभारण्यात येणाऱ्या यंत्रणेसाठी वापरण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तसेच या प्रकल्पाची तपासणी करून त्यात काही तात्पुरत्या दुरूती शक्‍य असल्यास त्यानुसारही तपासणी केली जात असल्याचे कंदूल म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)