सत्तेत आल्यानंतर राजीव गांधींच्या हत्यारांची सुटका करणार; डीएमकेचे आश्वासन  

चेन्नई – तामिळनाडू राज्यामधील विरोधीपक्ष द्रवीड मुनेत्रा काझगम (डीएमके) या पक्षाचे अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी आज निवडणुकीचे घोषणापत्र जाहीर केले. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्यारांना सोडण्याचे आश्वासन दिले आहे. एवढेच नव्हेतर नोटबंदी पीडितांना नुकसानभरपाई देण्याचीही घोषणा केली आहे. या घोषणापत्राद्वारे एमके स्टॅलिन यांनी मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला आहे.

राजीव गांधी यांच्या हत्यारांच्या सुटकेबाबत याआधी तामिळनाडू सरकार आणि राज्यपालांनी मागणी केली होती. परंतु, ती मान्य करण्यात आली नाही. आता पुन्हा एकदा राजीव गांधी यांच्या हत्यारांच्या सुटकेचा मुद्दा तामिळनाडू राजकारणाच्या मध्यभागी आला आहे. एमके स्टॅलिन यांच्या घोषणेने तामिळनाडूमध्ये नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.

डीएकमकेने पुद्दुचेरीला राज्याचा दर्जा देणार, श्रीलंका निर्वासितांना नागरिकता तसेच मनरेगाअंतर्गत १५० दिवसाच्या रोजगाराची हमी सारखे अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. १८ एप्रिल रोजी तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये एका टप्प्यातच मतदान होणार आहे. डीएमके २० जागांवर निवडणूक लढवत आहे.

दरम्यान, २१ मे १९९१ रोजी श्रीपरबंदूर येथे मानवी बॉम्बद्वारे राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील दोषी पेरारिवेलन, मुरुगन, नलिनी, शांतन, रविचंद्रन, जयकुमार आणि रॉबर्ट प्यास तीन दशकांपासून तुरुंगात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)