काश्‍मीरमधील फुटीरतावाद्यांना दणका

केंद्र आणि राज्य सरकारने सुरक्षेसोबत अन्य सर्व सुविधा रोखल्या

जम्मू/नवी दिल्ली – जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने प्रथम पाकिस्तानला आणि आता काश्‍मीरमधील फुटीरतावाद्यांना दणका दिला आहे. जम्मू-काश्‍मीर सरकार आणि केंद्र सरकारने दहशतवाद्यांना रसद पोहचविणाऱ्या आणि आयएसआयशी संपर्कात असलेल्या फुटीरतावादी नेत्यांची सर्व सुरक्षा काढून घेतली आहे. यात हुरियत कॉन्फरन्सचा नेता मीरवाईज उमर फारुक, अब्दुल गनी बट्ट, बिलाल लोन, हाशिम कुरैशी, शब्बीर शाह शामिल यांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारने दिलेल्या आदेशानुसार, फुटीरतावाद्यांना देण्यात आलेली सुरक्षा आणि गाड्या आजपासून काढून घेण्यात येत आहेत. या नेत्यांना सुरक्षा जवानांकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षा दिली जाणार नाही. तसेच सरकारकडून त्यांना अन्य काही सुविधा दिल्या असतील तर त्या तात्काळ मागे घेतल्या जातील. केंद्र सरकारच नाही तर राज्य सरकारकडून फुटीरतावादी नेत्यांना पोलीस सुरक्षा अथवा अन्य काही सुविधा दिल्या असतील तर त्या देखील मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जम्मू-काश्‍मीरमधील आधिकाऱ्याने सांगितले की, मीरवाइज उमर फारूक आणि अन्य चार नेत्यासह इतर फुटीरतावादी नेत्यांना यापुढे कोणतीही सुरक्षा दिली जाणार नाही. शिवाय त्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी गाड्याही काढून घेतल्या जाणार आहेत. या फुटीरतावाद्यांना जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी संरक्षण दिले होते.

पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थाशी (आयएसआय) संपर्क ठेवणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेची समिक्षा केली जाईल, असे पुलवामा हल्ल्यानंतर काश्‍मीर भेटीवर गेल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले होते. केंद्र सरकारच्या सल्ल्यानंतर आयएसआयशी संपर्क करत असलेल्याच्या ज्या फुटीरतावादी नेत्यावर संशय आहे अशा नेत्यांच्या सुरक्षाची समिक्षा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात राजौरी जिल्ह्यातील सीआरपीएफ जवान नासीर अहमद हा शहिद झाला. या शहिद जवानांच्या कुटुंबियांना जम्मू-काश्‍मीरकडून 20 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)