#AUS_vs_IND : पावसामुळे अखेर दुसरा टी-20 सामना रद्द

मेलबर्न – भारत वि आॅस्ट्रेलिया याच्यांतील तीन टी20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना सततच्या पावसाच्या व्यत्ययामुळे अखेर रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने पहिली लढत जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता रविवारी (25 नोव्हेंबर) होणाऱ्या अखेरच्या लढतीत भारताला विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी करत मालिका वाचविण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.

दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पावसामुळे खेळ थांबला तेव्हा 19 षटकात 7 बाद 132 धावा केल्या होत्या. त्यानंतर दोनदा मैदानाचे परिक्षण करण्यात आले. मात्र मैदानाची स्थिती पाहता अखेर पंचानी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

-Ads-

पहिल्यांदा पावसामुळे खेळ थांबला तेव्हा आॅस्ट्रेलियाने 19 षटकात 7 बाद 132 धावा केल्या होत्या. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 19 षटकांत 137 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. मात्र परत पावसाचा व्यत्यय आल्याने भारताला 11 षटकात 90 धावांचे आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा पावसामुळे खेळ सुरू न झाल्याने अखेर सामना रद्द करावा लागला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)