सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ‘आण्णा परत येतोय’च्या अनेक मीम्स व्हायरल झाल्या होत्या. या मीम्स नेमक्या कशासाठी होत्या या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून हा आण्णा कोण आहे हे सुद्धा स्पष्ट झाले आहे. हा आण्णा आहे संजय नार्वेकर आणि या मीम्सचा थेट संदर्भ आहे तो ये रे ये रे पैसा 2 या चित्रपटाशी.
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात भेटीला आलेल्या ये रे ये रे पैसा सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर काही महिन्यांनी सिनेमाचा दुसरा भाग येणार अशी चर्चा रंगली होती. अखेर या वर्षाच्या सुरूवातीला या सिनेमाच्या एक वर्षपूर्ती निमित्त सिनेमा रिलीज करायचा विचार सिनेमाच्या टीमचा होता पण काही कारणास्तव ते होऊ शकले नाही.
मात्र, आता नुकतेच सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या सिनेमाच्या पहिल्या भाग आदित्य (उमेश कामत), सनी (सिद्धार्थ जाधव), आणि बबली (तेजस्विनी पंडीत) यांच्यावर केंद्रित होता आणि त्यांच्यासोबत आण्णा ही मध्यवर्ती भूमिका साकारलेली होती संजय नार्वेकरने. सिनेमात त्याच्या पात्राने धमाल उडवून दिली होती. आता हाच आण्णा या सिक्वेल मध्ये मुख्य पात्र म्हणून दिसेल.