नेपच्युनच्या नव्या चंद्राचा शोध तेथील वातावरण जीवसृष्टीला पोषक असल्याचा अंदाज

कॅलिफोर्निया – कॅलिफोर्निया विद्यापीठातील सेटी इन्स्टिट्युटच्या शास्त्रज्ञांनी नेपच्यूनच्या नव्या चंद्राचा शोध लावला असून या चंद्रावरील वातावरण जीवसृष्टीला पोषक असल्याचा दावाही केला आहे. या चंद्राचे “हिप्पोकॅंप’ असे नामकरणही करण्यात आले आहे. “हिप्पोकॅंप’ या चंद्रावर जीवसृष्टी असल्याची शक्‍यता वर्तवली जात असून इथे एलियन्स भेटू शकतात, अशी चर्चा वैज्ञानिकांच्या वर्तुळामध्ये सुरू आहे.

शास्त्रज्ञया ग्रहावर 2013 सला पासून लक्ष ठेवून होते. पहिल्यांदा जेंव्हा त्यांना या ग्रहाचा शोध लागला होता. तेंव्हा त्यांनी याला भरकटलेला लघुग्रहाचा तुकडा असे संबोधले होते. त्याच बरोबर त्यांनी असा कयास लावला होता की, हा नेपच्युनच्या प्रोटियस नावाच्या चंद्रावर लघु ग्रहाच्या झालेल्या आघातातून बाहेर फेकला गेला आहे. कारण हिप्पोकॅंपचा एकूण आकार हा केवळ 34 किलो मीटर इतकाच असल्याने त्याच्या बद्दल अनेक कयास लगावले जात होते. नेपच्यूनच्या 12 उपग्रहांचा आतापर्यंत शोध लागला असून हा 13 वा उपग्रह आहे. ग्रीक पुराणांमध्ये “हिप्पोकॅंप’ नावाच्या एका काल्पनिक प्राण्याचा उल्लेख केला गेला आहे. त्या प्राण्याचे नावच या ग्रहाला देण्यात आले आहे. “हिप्पोकॅंप’वरील वातावरण खूप थंड आहे. येथील सूर्यप्रकाश आणि इतर गोष्टी जीवसृष्टीला पोषक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)