अन्न प्रक्रिया उद्योगांची व्याप्ती वाढणार :  हरसिमरत कौर बादल 

नवी दिल्ली  – भारतात मोठया प्रमाणात फळे आणि धान्य वाया जाते. त्यामुळे शेतकऱ्याना पुरेसा भावही मिळत नाही. यासाठी सरकारने अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना दिली आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे आगामी काळात या उद्योंगांची व्याप्ती वाढण्याची शक्‍यता शक्‍यता आहे असे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यानी सांगीले.

त्यांच्या हस्ते गुजरातमधल्या पहिल्या मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन झाले. सुरत जिल्ह्यातल्या मंगरोल तालुक्‍यातल्या शाह आणि वसारवी गावांमध्ये हा पार्क आहे. गुजरातमधल्या मेहसाणा जिल्ह्यात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे दुसऱ्या मेगा फूड पार्कला मंजुरी देण्यात आली आहे. त्या म्हणाल्या की या क्षेत्रात देशातून आणि परदेशातूून गुंतवणूक व्हावी याकरीता प्रयत्न करण्यात येत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उद्‌घाटन झालेल्या फूड पार्कमुळे सुरत तसेच नवसारी, तापी, नर्मदा आणि भरूज जिल्ह्यातल्या जनतेला लाभ होणार आहे. 117 कोटी 87 लाख रुपये खर्चाचा हा फूड पार्क सुमारे 70 एकर जमिनीवर उभारण्यात आला आहे. या फूड पार्कमध्ये कोल्ड स्टोअर, गोदामं तसेच अन्न प्रक्रियेशी संबंधित इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या पार्कमुळे सुमारे 5,000 लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध होणार असून या भागातील सुमारे 25,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगाला सरकार मोठी चालना देत आहे असे बादल यांनी यावेळी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)