शाळांना पडला माहिती भरण्याचा विसर

यू-डायस प्लस प्रणालीवर माहिती भरण्यास दिली मुदतवाढ

पुणे – शालेय शिक्षण विभागाने वारंवार सूचना देऊनही राज्यातील 675 शाळांना यू-डायस प्लस प्रणालीवर ऑनलाइन माहिती भरण्याचा विसर पडला आहे. या शाळांना माहिती भरण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या वतीने सर्व शाळांची सविस्तर माहिती एकत्रित करण्यासाठी यू-डायस प्लस प्रणाली कार्यान्वित केली आहे. शासनाच्या विविध योजना राबविताना या माहितीचा सतत महत्त्वपूर्ण वापर होणार आहे. सन 2019-20 या वर्षात राबविण्यात येणाऱ्या शगुनउत्सव या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी शाळांच्या माहिती मोठ्या प्रमाणत उपयोग होणार आहे. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व शाळांना 15 जूनपर्यंत माहिती भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. राज्यात एकूण 1 लाख 10 हजार 247 शाळा आहेत. यातील 10 लाख 8 हजार 777 शाळांनी माहिती भरण्याचे काम पूर्ण केले आहे. यातील 99 हजार 831 शाळांची माहिती प्रमाणितही करण्यात आली आहे.

अद्यापही काही शाळांनी माहितीच भरली नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे. यात सर्वाधिक 114 शाळा या पुणे जिल्ह्यातील आहेत. 695 शाळांचे माहिती भरण्याचे काम सुरू आहे. येत्या 30 जून रोजी शाळांची माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य कार्यालयामार्फत केंद्र शासनाकडे सादर करावयाची आहे. त्यामुळे या आधीच सर्व शाळांनी प्रणालीवर माहिती भरावीच लागणार आहे. शाळांची माहिती अद्ययावत करुन पूर्ण करण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश शिल्लक असलेल्या शाळांची माहिती भरण्याबाबत आदेश देण्यात यावेत, अशा सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रशासन विभागाच्या सहसंचालक सुवर्णा खरात यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

माहिती न भरलेल्या शाळांची संख्या
पुणे-114, औरंगाबाद-99, नांदेड-80, परभणी-22, जालना-29, ठाणे-49, अहमदनगर-26, बीड-55, लातूूर-12, सोलापूे-14, सातारा-9, रत्नागिरी-4,सिंधुदुर्ग-1, कोल्हापूर-10, सांगली-12, पालघर-27, धुळे-1, जळगाव-3, बुलढाणा-7, अकोला-13, वाशिम-9,अमरावती-6, नागपूर-53, भंडारा-4, यवतमाळ-1, हिंगोली-3, नाशिक-1, मुंबई-4, रायगड-5, उस्मानाबाद-2.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)