अनधिकृत शाळांच्या यादीत पुन्हा तीच नावे

सात अनधिकृत शाळांची घोषणा : शिक्षण विभागाच्या कारवाईवर प्रश्‍नचिन्ह

यंदाच्या वर्षी जाहीर केलेल्या अनधिकृत शाळा

स्मार्ट इंग्लिश मिडीयम स्कूल मोशी

मॉडर्न पब्लिक स्कूल रहाटणी
ज्ञानराज प्राथमिक शाळा, कासारवाडी (मराठी)
मास्टर केअर इंग्लिश स्कूल, आळंदी रोड
ग्रॅट मीरा इंग्लिश मिडीयम स्कूल, कुदळवाडी
पुणे इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव
ज्ञानराज स्कूल भोसरी (इंग्रजी)

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शहरातील अनधिकृत खासगी शाळांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये, यंदा सात शाळांना अनधिकृत जाहीर करण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब अशी की या सात शाळांमध्ये गेल्या वर्षीच्या अनधिकृत चार शाळांचा पुन्हा एकदा समावेश करण्यात आला आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या अनधिकृत शाळांवर कोणतीही विशेष कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.

शहरात 587 खासगी शाळांची मान्यता देण्यात आली आहे. गेल्या वर्षी 17 अनधिकृत शाळा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामधील, यंदा 10 शाळांना मान्यता मिळाली असून इतर सात शाळांना सूचना देऊनही अद्याप शाळांनी मान्यता मिळविण्यास दिरंगाई केल्याने त्या शाळांना अनधिकृत ठरविण्यात आले आहे. तसेच, शहरातील अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. दरम्यान, शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण करण्यात येते.

या सर्वेक्षणात यंदा सात अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. पालकांनी शाळा मान्यताप्राप्त असल्याची शहानिशा करणे आवश्‍यक आहे. पालकांनी पाल्याला प्रवेश घेताना शाळा अधिकृत मान्यताप्राप्त असल्याची शहानिशा करणे आवश्‍यक आहे. गेल्या वर्षी 17 अनधिकृत शाळांवर कारवाई करणे आवश्‍यक होते. मात्र, शिक्षण विभागाने केवळ नोटीसा पाठवण्यात धन्यता मानली. यामुळे, शिक्षण विभागच बेकायदेशीरपणे चालविल्या जाणाऱ्या शाळांना अभय देत की काय? असा प्रश्‍न निर्माण झाला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here