येतेय मल्टिस्टार चित्रपटांची लाट (भाग१)

मल्टिस्टार चित्रपट नेहमीच तयार होत आले आहेत. पण मध्यंतरीच्या काळात बड्या कलाकारांनी त्याला ब्रेक लावला होता. आता करण जोहर आणि आदित्य चोप्रा यांच्यासारखे निर्माते पुन्हा एकदा बड्या कलाकारांना घेऊन चित्रपट बनवत आहेत. येणाऱ्या काळात मल्टिस्टार चित्रपटांची जणू लाटच येणार आहे. बड्या कलाकारांच्या गर्दीमुळे प्रेक्षकही चित्रपटगृहाकडे आकर्षित होतील आणि चित्रपटांचा मजबूत व्यवसाय होईल, अशी निर्मात्यांची अपेक्षा आहे. पाहूया ती किती फलद्रुप होतेय! 

बॉलिवूडच्या इतिहासात मल्टिस्टार चित्रपट आजवर अनेक प्रसिद्ध झाले आहेत. करण जोहर आणि आदित्य चोप्रा यांसारखे मोठे निर्माते बड्या सिताऱ्यांना घेऊन बिग बजेट चित्रपट निर्माण करण्यात आघाडीवर राहिले आहेत. मध्यंतरीच्या काळात हा प्रवाह काहीसा मागे पडला होता. पण आता पुन्हा एकदा बहुकलाकार असणाऱ्या चित्रपटांची लाट येते आहे. काही दिवसांपूर्वी करण जोहरने ट्‌वीटर वरून स्वतःच दिग्दर्शित करत असलेल्या “तख्त’ या चित्रपटाची घोषणा केली.

या ट्‌वीटमध्ये त्याने एक पोस्टरही टाकले होते. त्यात रणवीर सिंह, करिना कपूर, आलिया भट्ट, विक्की कौशल, भूमि पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर या सर्वांची नावे कलाकार म्हणून दिली होती. यापूर्वी करण जोहरने पीरियड ड्रामा म्हणून “कलंक’ची घोषणा केली होती. या चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित, वरुण धवन, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा, किआरा अडवाणी, कृति सैनन, कुणाल खेमू आणि हितेन तेजवानी या कलाकारांना घेतले होते. संजय दत्त आणि माधुरी दीक्षित या जोडीला घेऊन कास्टिंग केले गेले होते. या दोन्ही चित्रपटांमुळे करणला आजही मल्टिस्टारर चित्रपटांमध्येच रुची असल्याचे दिसते.

करण जोहर जेव्हा “धडक’, “राजी’, “इत्तेफाक’, “बद्रीनाथ की दुल्हनिया’, “ओके जानू’ सारख्या रोमॅंटिक जोड्यांना घेऊन चित्रपट निर्माण करत होता तेव्हाच मोठ्या बजेटचे आणि बड्या कलाकारांबरोबरचे मल्टिस्टार चित्रपट बनवण्याच्या घोषणाही करत होता. रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्‍वर्या राय बच्चन, फवाद खान याच्याबरोबर “ए दिल है मुश्‍किल’ हे त्याचेच एक उदाहरण. या दरम्यान घोषणा केलेल्या “ब्रह्मास्त्र’ मालिकेतील तीन चित्रपट रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, मौनी रॉय, अक्किनेमी नागार्जून आणि डिंपल कपाडिया यांच्याबरोबर केले जात आहेत. कदाचित “ब्रह्मास्त्र’च्या पुढच्या दोन भागांमध्ये आणखीही काही कलाकार सामील होऊ शकतात. नुकतेच त्याने अक्षय कुमार, करिना कपूर खान, दिलजीत दोसांज आणि किआरा अडवाणी या कलाकारांसमवेत विनोदी प्रेमपट असलेला “गुड न्यूज’ ह्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)