कंपन्यांचे निकाल आणि दमदार शेअर्सचा शोध 

प्रसाद भावे 
कंपन्यांचेतिमाही निकाल आणि शेअरमधील चढउतार यांचा संबध तर आहेच, पण चांगल्या कंपन्या शोधण्याचा तो एक मार्ग आहे. या तिमाहीत अशा कोणत्या कंपन्यांचा शोध लागला, ते आपण पाहुयात.

जुलै महिना चालू झाला की मुख्यत्वे गुंतवणूकदारांना वेध लागतात ते म्हणजे कंपन्यांच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांचे व हे सत्र साधारणपणे पुढचे दीड-दोन महिने चालू राहते. साहजिकच बाजार त्या अनुषंगाने दोलायमान राहतो, कधी तो चांगल्या रिझल्ट्‌सच्या अपेक्षेनं आधीच उसळी मारतो तर अपेक्षापूर्ती झाली नाही म्हणून कोसळतो देखील, अगदी ज्याप्रकारे एखाद्या जुगाऱ्याकडून नावडीचे पत्ते फेकले जावेत त्याप्रमाणे!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आतापर्यंत, एकूण 4248 कंपन्यांपैकी 817 कंपन्यांचे निकाल जाहीर झालेले आहेत. आतापर्यंतची आकडेवारी विचारात घेता या कंपन्यांची एकूण विक्री ही 19.9% नी वाढून 8,33,106.1 कोटी रुपयांवर पोहोचली, जी मागील वर्षातील (2017) पहिल्या तिमाहीत होती 6,95,146.7 कोटी रुपये. तर या कंपन्यांच्या ढोबळ नफ्याचा विचार केल्यास यात 32.6% वाढ आहे तर नक्त नफ्याचा विचार केल्यास ती वाढ 15.8% नोंदवली गेलीय. निकाल जाहीर झालेल्या सर्व 817 कंपन्यांचा मागील वर्षातील पहिल्या तिमाहीतील नफा 75,508.2 कोटी रुपयांवरून 87,444.9 कोटी रुपयांवर पोहोचलाय.

निकाल जाहीर झालेल्या कांही कंपन्यांबद्दल विचार करण्यापूर्वी आपण काही संज्ञा समजून घेऊ, त्या म्हणजे धेध व टेट. तर धेध म्हणजे इयर ओव्हर इयर व टेट म्हणजे क्वार्टर ओव्हर क्वार्टर. धेध म्हणजे त्या कंपनीच्या मागील वर्षातील त्याच तिमाहीच्या निकालाशी तुलना म्हणजेच जून 2017 ला संपलेली तिमाही व जून 2018 ला संपलेली तिमाही. तर टेट म्हणजे मागील तिमाही (मार्च 2018) व आता संपलेली तिमाही (जून 2018) यांमधील तुलना. तसेच अनेकदा आपण वाचतो किंवा ऐकतो की, निकाल अपेक्षेपेक्षा चांगले/वाईट, आता या अपेक्षा या अनेक प्रसारमाध्यमांकडून किंवा बाजार विश्‍लेषकांकडून व्यक्त केल्या जातात. कंपनीची त्या तिमाहीतील एकूण वाटचाल व कंपनीच्या बाबतीतील एकंदर घडामोडी तपासून कांही अंदाज बांधले जातात, यालाच त्या कंपनीबाबतीत असलेल्या बाजाराकडूनच्या अपेक्षा असं संबोधलं जातं. त्यामुळं उदा. समजा एखादी कंपनी या तिमाहीत 100 कोटीं रु.चा तोटा जाहीर करेल असा अंदाज असेल; परंतु प्रत्यक्षात त्या कंपनीनं 50 कोटी रुपयांचाच तोटा जाहीर केला तरी तो निकाल अपेक्षेपेक्षा चांगला आल्यामुळं त्या कंपनीचा शेअर वधारू शकतो.

आता आपण निफ्टी निर्देशांकात समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील कांही कंपन्यांकडं पाहू. खाली दर्शविलेल्या तक्त्‌यात निफ्टी
निर्देशांकातील काही निवडक कंपन्यांचे निकाल दिलेले आहेत.

सर्वप्रथम आपण बॅंकिंग सेक्‍टरकडं वळू. देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी असलेली एचडीएफसी बॅंक, कोटक बॅंक, येस बॅंक इंडसइंड बॅंक, ऍक्‍सिस बॅंक व आयसीआयसीआय बॅंक. यांत विशेष की यंदाच्या तिमाहीत प्रथमच आयसीआयसीआय बॅंकेनं तोटा जाहीर केलेला आहे. आकडेवारीत एचडीएफसी बॅंकेचा नफा हा जास्त आहे परंतु वाढ ही येस बॅंकेची अधिक आहे. नंतर पाहू ऑटोमोबाईल क्षेत्राकडं, निफ्टीमधील ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांपैकी सर्वांत चांगले निकाल हे मारुतीनं दिलेले आहेत, त्यांची नफ्यातील वाढ ही (धेध) 26.91 % आहे तर त्यांची प्रतिस्पर्धी असलेली टाटा मोटर्स ह्या कंपनीनं तब्बल 1862 कोटी रुपयांचा तोटा जाहीर केलाय. टू व्हीलर क्षेत्रात बजाज-ऑटोनं बाजी मारलीय, त्याच्या नफ्यातील वाढ 24.52 % नोंदवली गेलीय तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्यास म्हणजे हीरो मोटो कॉर्पला वाढीत भर घालता न आल्यानं त्यांचा नफा साधारणपणे तेवढाच म्हणजे 909 कोटी रु. राहिलाय. औषध कंपन्यांपैकी डॉ. रेड्डीजनं उत्तम निकाल जाहीर केलेत, त्यांचा नफा साधारणपणे 8 पटीनं वाढून 456 कोटी रुपयांवर पोहोचलाय. टीसीएस या या सॉफ्टवेअर जायंटनी 23.47 % नफ्यात वाढ जाहीर केला तर इन्फोसिसनं केवळ 3.7 टक्केच वाढ नोंदवलीय परंतु 1:1 बोनस जाहीर झाल्यानं त्याचा भाव वधारलाय. आकड्यांच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीजनं सर्वांवर मात केलीय, पहिल्या तिमाहीत कंपनीनं 9459 कोटी रुपयांचा नफा कमावलाय. टायटन या रिटेल क्षेत्रातील कंपनीनं आपल्या नफ्यात 31 टक्क्‌यांची भरारी घेतलीय व नफा 349.17 कोटी रुपयांवर नेऊन ठेवलाय.

अजूनही बऱ्याचशा कंपन्यांचे निकाल येणं बाकी आहेत; परंतु त्याआधीच त्यांच्या अपेक्षेनं बाजारानं उर्ध्व दिशेस कूच केलीय. निफ्टी व सेन्सेक्‍स, आपल्या आतापर्यंतच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान आहेत. वारंवार उल्लेख केल्याप्रमाणं ह्या तेजीची चाहूल ही आलेखावर आधीच लागली होती. एकूण निफ्टीसाठी पुढील प्रथम उद्दिष्ट ही अनुक्रमे 11700 व 12200 या पातळ्यांवर असू शकतात. येणाऱ्या दिवसात ही झेप कोटींची उड्डाणे घेतेय की त्यास खीळ बसतेय ते आता पाहायचे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)