चटक्‍याचा परिणाम तापमानदर्शक बोर्डावरही!

आकडेवारी “अपडेट’ होईना

पुणे – वाढत्या उष्णतेचा चटका सर्वसामान्यांबरोबर निवडणुकातील स्टार प्रचारकांनाही बसला आहे, तसा तो हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या पुणे वेधशाळेतील अर्थात सिमला ऑफिसच्या बाहेर लावलेले तापमानदर्शकाला बहुदा बसला असावा. कारण कधीच पुण्याने न पाहिलेला तापमानाचा पारा चढणारा पारा पाहून हे तापमानदर्शक यंत्रही बंद पडलेले दिसत आहे असे गंमतीने म्हणावे लागेल.

थंड हवेचे ठिकाण असलेल्या सिमला येथून सुमारे 90 वर्षांपूर्वी हे कार्यालय पुण्यात स्थलांतरित करण्यात आले. पुण्याचे हवामान त्यावेळी सिमल्याप्रमाणेच होते, असे सांगितले जाते. त्यामुळेच ब्रिटीश गव्हर्नर मुंबईहून पुण्यामध्ये संपूर्ण उन्हाळाभर मुक्कामाला येत असत. मात्र, हळूहळू तो थंडावा संपला आणि प्रदूषणाच्या यादीत पुण्याचे स्थान आता अव्वल ठरत आहे. आता तर पुण्याचे तापमानही वाढू लागल्याने ते अक्षरश: आग ओकू लागले आहे.

त्याच स्थलांतरित झालेल्या सिमला ऑफिसच्या बाहेर शहराचे तापमान अगदी स्पष्टपणे दिसावे यादृष्टीने ऑफिसच्या बाहेरच हे तापमानदर्शक लावले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे तापमानदर्शक बंद अवस्थेत आहे. त्याची दुरुस्ती अद्यापही करण्यात आली नाही. या रस्त्याने रोज जा-ये करणाऱ्यांना हा तापमानाचा बोर्ड पाहण्याची सवय आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो बंद असल्याने जाता येता तापमान पाहण्याची सवय असणाऱ्यांना काहीतरी चुकल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे शहराचा नव्हे राज्याचाच उष्णतेचा पारा एवढा चढला आहे की, त्याच्या प्रभावाने हे मशीनच बंद पडले असा विनोद बघ्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)