भांडवल उपलब्ध करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेचे प्रयत्न 

मुंबई  – देशांतर्गत वित्तीय बाजारात रोख रकमेची भासणारी चणचण चालू आठवड्यात वाढून 1.4 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने बॉण्डची खरेदी करून बाजारातील रोख रक्कम वाढविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा प्रयत्नही कमी पडल्याचे चित्र आहे. सध्याच्या सणासुदीच्या कालावधीत रोख रकमेची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात रोख रकमेची मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

अर्थव्यवस्थेतील तरलता झपाट्याने घटत आहे. मार्चपर्यंत वित्तीय बाजारात अडीच लाख कोटी रुपयांची चणचण निर्माण होण्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बॅंकेला आगामी कालावधीत सातत्याने अर्थव्यवस्थेत रोख रक्कम टाकावी लागेल. दोन आठवड्यांपूर्वी अर्थव्यवस्थेत पुन्हा रोख रकमेची चणचण निर्माण झाली होती. 9 ऑक्‍टोबरनंतर किमान तीनवेळा एक लाख कोटी रुपयांची चणचण भासली आहे. गेल्या सोमवारी अर्थव्यवस्थेतील रोख रकमेची मागणी 1.4 लाख कोटी रुपयांवर पोहोचली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर, एका दिवसातच ही मागणी 94,200 कोटी रुपयांवर गेली. ऍक्‍सिस बॅंकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ सौगत भट्टाचार्य यांच्या मते रिझर्व्ह बॅंकेने रुपयाची घसरण थांबवण्यासाठी डॉलरच्या विक्रीचा निर्णय घेतला. त्यामुळे रोख रकमेची कमतरता निर्माण झाली आहे. तरलतेची समस्या दूर करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने बॉण्डखरेदीचा सपाटा लावला असून, ऑक्‍टोबरमध्ये 36 हजार कोटी रुपयांची बॉण्डखरेदी केली आहे. सप्टेंबरमध्ये बॅंकेने 30 हजार कोटी रुपयांची बॉण्डखरेदी कोली होती. बॅंकेकडून खुल्या बाजारातील व्यवहारांचा उपयोग बॅंकिंग व्यवस्थेत रोख रकमेची वाढ अथवा घट करण्यासाठी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)