महाराष्ट्राच्या नील रॉयची विक्रमी कामगिरी, स्वदेश मंडलचा चौथा राष्ट्रीय विक्रम

राष्ट्रीय जलतरण स्पर्धा

पुणे: एसएफआय संघाच्या नील रॉयने 17 वर्षांखालील मुलांच्या 200 मीटर इंडिव्हिज्युअल मिडले प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करताना सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचा आजचा दिवस गाजविला. नीलने बंगळुरू येथील राष्ट्रीय स्पर्धेत 2016 मध्ये केलेला स्वतःचाच विक्रम मोडला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ग्लेनमार्क 35 व्या सब-ज्युनिअर आणि 45 व्या ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण अजिंक्‍यपद स्पर्धेत पश्‍चिम बंगालच्या स्वदेश मंडलची स्पर्धेतली घोडदौड सुरूच असून आज त्याने पुन्हा एकदा राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. या स्पर्धेत आजपर्यंत त्याच्या नावावर चार राष्ट्रीय विक्रम नोंदले गेले आहेत.

डायव्हिंगमध्ये एसएफआयच्या बिल्वा गिरम आणि हृदयी वाघ यांनी अनुक्रमे 3 मीटर स्प्रिंग बोर्ड आणि प्लॅटफॉर्म प्रकारात सुवर्णपदके पटकावली. तसेच कर्नाटकच्या श्रीहरी नटराजने 17 वर्षांखालील मुलांच्या गटात 50 मी बॅकस्ट्रोक प्रकारातील प्राथमिक फेरीत गेल्या वर्षीचा स्वतःचा विक्रम मोडला. इतकेच नव्हे तर सायंकाळच्या सत्रात त्याने स्वतःचा विक्रमही मोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)