महापालिकेतील दिव्यांगांसाठीचा रॅम्प अखेर पूर्ण

प्रभातच्या पाठपुराव्याला यश : नवीन रॅम्पचे महापौरांच्या हस्ते लाकार्पण

पुणे – महापालिका मुख्य इमारतीत येणाऱ्या दिव्यांग नागरिकांसाठी कायमस्वरूपी “रॅम्प’ उभारण्यात आला असून या रॅम्पचे लोकार्पन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. मुख्य इमारतीत जाण्यासाठी “रॅम्प’ नसल्याने एक 18 वर्षीय दिव्यांग युवक प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवरून घसरून जखमी झाला होता. ही घटना 16 डिसेंबर 2017 मध्ये घडली होती. या प्रकाराला दैनिक “प्रभात’ने वाचा फोडत प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आणला होता. त्यानंतर, या रॅम्पबाबत दैनिक “प्रभात’कडून वेगवेगळ्या वृत्तांद्वारे पाठपुरावा केला जात होता. नगरसेवक विजय शेवाळे, नगरसेविका मुक्ता जगताप, रिपाइंच्या सुनीता वाडेकर, नगरसेविका मंजूश्री खर्डेकर यांच्यासह दिव्यांग यावेळी उपस्थित होते.  तसेच “उपचार करण्यासाठी कोणीतरी पुढे या, प्रथमोपचार पेटी असेल तर द्या,’ अशी विनंती सुरक्षा रक्षकांकडे तसेच बघ्याच्या भूमिकेतील कर्मचाऱ्यांकडे केली. मात्र, त्यांच्या मदतीला कोणीही पुढे आले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी दैनिक “प्रभात’च्या प्रतिनिधीने हा प्रकार पाहिला. त्यानंतर त्या सुरक्षा रक्षकांकडे तसेच या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांकडे “प्रथमोपचार पेटी अथवा या मुलाला रुग्णालयात नेण्यासाठी सुविधा आहे की नाही?’ याची विचारणा केली. मात्र, येथे काहीच नसल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार सुरू असतानाच, सह महापालिका आयुक्त माधव देशपांडे प्रवेशद्वाराजवळ आले. “प्रभात’ प्रतिनिधीने त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी तत्काळ आपले वाहन या युवकास रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली होती.

दीड वर्षांपूर्वी काय घडला होता प्रकार…

दिव्यांगांसाठी “रॅम्प’ नसणे तसेच सुविधांचा लाभ मिळत नसल्याने आयुक्तांना निवेदन देण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे सदस्य 16 डिसेंबर 2017 रोजी महापालिकेत आले होते. बैठक संपल्यानंतर हे सदस्य आयुक्त कार्यालयातून खाली येऊन प्रवेशद्वार पायऱ्यांजवळ आले. तेथील काही सुरक्षा रक्षकांनी दिव्यांगांना खुर्चीवरून खाली सोडले. मात्र, इतरांना चालत जाण्यास सांगण्यात आले. त्यात खडकी येथील राहूल सीताराम मगर हा युवकही पायऱ्यांवरून खाली येत होता. मात्र, तोल गेल्याने तो पडला. सहकाऱ्यांनी त्याला उचलले. मात्र, त्याच्या हाताला जखम झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. त्यावेळी सोबतच्या दिव्यांग महिलेने त्याला उचलून घेत रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)