वढेरांवर छापेमारी हे सत्ताधाऱ्यांच्या भेदरलेपणाचे लक्षण : कॉंग्रेसचा मोदींवर पलटवार

नवी दिल्ली: रॉबर्ट वढेरा यांच्या सहकाऱ्यांवर घालण्यात आलेले ईडीचे छापे म्हणजे निवडणुकीतील पराभवाचा अंदाज आल्यामुळे भेदरलेल्या सत्ताधाऱ्यांनी अगतीकतेतून केलेली कृती आहे अशा शब्दात कॉंग्रेसने आज केंद्र सरकारवर निशाणा साधला. काल रॉबर्ट वढेरा यांच्या सहकाऱ्यांवर घालण्यात आलेल्या ईडीच्या छापेमारीच्या संबंधात कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु संघवी यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की कायद्याचे राज्य असलेल्या या देशात सरकारने अशा प्रकारचा जो भीषण दहशतवाद चालवला आहे तो यापुर्वी कधीही पहाला मिळाला नाही. आम्ही ब्रिटीशंच्या विरोधात लढा दिला आहे, त्यामुळे भाजपलाही आपले काय होणार आहे याची चांगली कल्पना आली आहे असा टोमणाही त्यांनी मारला आहे.

काल शुक्रवारी ईडीने सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या तीन सहकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे मारले. त्यात नेमके काय मिळाले याची माहिती सरकारकडून उपलब्ध झालेली नाही. या संबंधात सिंघवी म्हणाले की सरकार कॉंग्रेसला आणि त्यांच्या मुल्याधिष्ठीत राजकारणाला घाबरली आहे. त्यामुळे त्यांनी आता त्यांनी लोकांना धमकावण्याचे व दहशतीत ठेवण्याचे काम हाती घेतले आहे. अशा छाप्यांद्वारे चारित्र हनन करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. भाजपवाले सध्या चांगलेच गोंधळलेले असून त्याचेच हे लक्षण आहे.

भाजपला सर्वच पातळ्यांवर अपयश आले आहे. त्यावर लोकांनी चर्चा करू नये म्हणून त्यांचे लक्ष विचलीत करण्यासाठी केला जाणारा हा प्रयत्न आहे असेही सिंघवी यांनी म्हटले आहे. काही जणांना संरक्षण विषयक करारातून कमिशन मिळाले आहे या संशयातून ईडीने काल हे छापे घातले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)