संबित पात्रांच्या व्हिडीओने ‘उज्वला’ योजनेच्या यशावर प्रश्नचिन्ह

ओडिशा : आपल्या भडक वक्तव्यांमुळे सतत माध्यमांच्या प्रकाशझोत राहणारे भाजपचे प्रवक्ते तथा ओडिशातील पुरी येथील भाजपचे लोकसभा उमेदवार संबित पात्रा यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली आहे. संबित पात्रा सध्या आपल्या मतदारसंघातील जनतेच्या भेटीगाठी घेण्यामध्ये व्यस्त असून मतदारसंघातील लोकांच्या भेटीगाठींचे व्हिडिओ ते समाजमाध्यमांद्वारे शेअर करत आहेत.

मात्र संबित पात्रा यांनी आज दुपारी पोस्ट केलेला एक व्हिडिओ त्यांच्यासाठी तसेच पक्षासाठी भलतीच डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, संबित पात्रा हे आज आपल्या मतदारसंघातील एका गरीब कुटुंबाच्या घरी भोजनासाठी गेले होते. तेथे भोजन करतानाचा एक व्हिडिओ त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर शेअर केला असून या व्हिडिओमध्ये सदर कुटुंबातील महिला चुलीवर स्वयंपाक बनवताना दिसत आहे. चुलीवर स्वयंपाक बनवणाऱ्या महिलेला संबित पात्रा यांच्या व्हिडिओमध्ये पाहून नेटकऱ्यांनी भाजपच्या उज्वला योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
भारतीय जनता पक्षातर्फे उज्वला योजनेद्वारे देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन वाटल्याचा दावा करण्यात आला आहे मात्र संबित पात्रा यांच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेच्या घरी गॅस कनेक्शन नसल्याचे पाहून आता या योजनेच्या यशाबद्दल समाज माध्यमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

https://twitter.com/sambitswaraj/status/1112247002673233922

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)