भविष्यात पाण्याचा प्रश्‍न भेडसावणार : राजेंद्र माहुलकर

पुणे – पुण्यातील वाढते बांधकाम व लोकसंख्या, स्थलांतरितांचे प्रमाण आदी कारणांमुळे भविष्यात शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावणारा आहे. त्यादृष्टीने आताच नियोजन करायला हवे, असे मत पर्यावरण अभ्यासक राजेंद्र माहुलकर यांनी सांगितले.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे (बीएआय) “पाणी आणि पाण्याचे व्यवस्थापन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी माहुलकर बोलत होते. यावेळी किशोर पंपचे किशोर देसाई, वरिष्ठ सल्लागार सुभाष देशपांडे, “बीएआय’चे अशोक अष्टेकर, एस. एम. अदसर आदी उपस्थित होते.

-Ads-

खडकवासला साखळी प्रकल्पातील पानशेत, वरसगांव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांची पाणी साठवणूक क्षमता 29 टीएमसी आहे. शहराच्या सीमांमध्ये वाढ होत आहे. भौगोलिक क्षेत्र विस्तारत असताना पाण्याचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा. त्याचप्रमाणे प्रस्तावित भामा-आसखेड प्रकल्पातून मिळणारे 2 टीएमसी, धरणातील उपलब्ध पाण्याचा साठा, बांधकामाचे प्रमाण, पुण्यात स्थायिक होणाऱ्यांची संख्या, वाढते शहरीकरण याचा सर्वंकष विचार करून पाण्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. सध्याची परिस्थिती पाहाता येत्या काळात पुण्यात पाण्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे, याकडे माहुलकर यांनी लक्ष वेधले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)