फेरीवाल्याच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा : शिवसेनेचा महापालिकेवर मोर्चा

कोल्हापूर/ प्रतिनिधी – कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने गेल्या आठवड्याभरापासून शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे. अतिक्रमण हटवल्यानंतर विस्थापित झालेल्या फेरीवाल्यांच योग्य ठिकाणी पुनर्वसन करणं हे देखील अत्यावश्यक आहे. परंतु महापालिकेनं पुनर्वसनासंदर्भात कोणताही निर्णय न घेता कारवाई सुरू ठेवली आहे . याच्या निषेधार्थ शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली फेरीवाला संघटनेच्या वतीने आज महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. फेरीवाल्यांचा पुनवर्सन प्रश्न सोडवला नाही तर महापालिकेवर ती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करू असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे

गेल्या काही दिवसापासून शहरात अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु केली असल्यामुळे शिवसेना फेरीवाला संघटनेमार्फत महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. गंगावेश येथून सुरु झालेला हा मोर्चा दुपारी बारा वाजता महापालिकेसमोर पोहचला. त्याठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली. मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. त्यावेळी आमदार क्षीरसागर यांनी आक्रमक भाषण करताना फेरीवाल्यांना हात लावाल तर उखडून टाकण्यात येईल, असा इशारा दिला. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी न करताच जर बेकायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर फौजदार गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोर्चाच्या सामोरे जाऊन अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी निवेदन स्वीकारले. मोर्चाचे नेतृत्व आमदार क्षीरसागर, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, धनाजी दळवी, किशोर घाडगे, रघुनाथ टिपुगडे, दिपक गौड यांनी केले. मोर्चात शिवसैनिकांसह फेरीवालेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)